नाशिक: कुंभमेळ्याच्या नावाखाली सतराशे झाडे वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींची बैठक संपन्न
Nashik, Nashik | Nov 27, 2025 झाडतोडीच्या तीव्र विरोधात नाशिक शहरातील विविध संस्था, संघटना तसेच नागरिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक हुतात्मा स्मारक, नाशिक येथे पार पडली. तपोवनचे पर्यावरण, जैवविविधता जपण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत शाळा–महाविद्यालयांमध्ये सह्यांची मोहीम, सेल्फी पॉइंट उभारणे, स्थानिक गणेश मंडळे, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याशी संपर्क साधून झाडतोडीबाबत माहिती देणे, तसेच नागरिकांसाठी संपर्क केंद्रे स्थापन करण्याचे ठरले.