शिरपूर: समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोराडी ग्रामपंचायतीमार्फत भव्य वृक्षारोपण,ग्रामस्थांना उत्स्फूर्त सहभाग
Shirpur, Dhule | Nov 21, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोराडी ग्रामपंचायतीत दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास २१०० मोहगनी रोपांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत श्रमदानातून या उपक्रमात सहभाग नोंदवला.हे वृक्षारोपण बोराडी –सांगवी रस्त्यालगत वनविभागाच्या परिसराजवळील जागेवर तार कंपाउंड करून करण्यात आले