रामटेक: गडमंदीर रामटेक येथे पहाटे माजी मंत्री राजेंद्र मुळक खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह अनेकांची काकड आरतीत हजेरी
Ramtek, Nagpur | Nov 3, 2025 सोमवार दिनांक 3 नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता पासून गडमंदिर रामटेक येथे नियमित होणाऱ्या काकड आरतीला माजी मंत्री राजेंद्र मूळक,रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. श्रीरामाची मनोभावे काकड आरती केली. तसेच सर्वांचे आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली. यानंतर उपस्थितांना अल्पोपहार, जल, मिठाईचे वितरण करण्यात आले.