पोंभुर्णा तालुक्यातील खरमत येथे शेतातील विहिरीत तोल गेल्याने पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुकवारी (दि. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०, रा. खरमत) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रदीप हेपटे हे आपल्या शेतात धान बांधणीचे काम करीत होते. दरम्यान पिण्याचे पाणी आणण्यासाठी ते विहिरीकडे गेले असता अचानक तोल गेल्याने ते विहिरीत कोसळले. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतकार्य सुरू केले; मात्र