एमआयडीसी कार्यालयात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका लघुउद्योजकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार अंबड एमआयडीसीत घडला.आरोपी संतोष प्यारेलाल शर्मा याने फिर्यादी निखिल नरेश राऊत या लघुउद्योजकाविरुद्ध अवैध बांधकाम केल्याची तक्रार सातपूरच्या एमआयडीसी कार्यालयात केली होती.ही तक्रार मागे घेण्यासाठी शर्माने निखिल राऊत यांना धमकी देऊन त्यांच्याकडून दीड लाख घेतले. त्यानंतर धमकी देऊन अजून दीड लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले.