तुमसर: चिखली येथे शेतातील विहिरीमधून मोटर पंप चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील चिखली येथे शेतातील विहिरीमधून मोटर पंप चोरीला गेल्याची घटना दि.9 नोव्हेंबर रोज रविवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी लक्ष्मण श्यामदेव निनावे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या शेतातील विहिरीमध्ये मोटर पंप बसविले असता अज्ञात आरोपींनी मोटर पंप चोरून नेले. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.