ठाणे: शिळफाटा येथील नागरिकांची ठाणे मनपा कार्यालयाबाहेर आंदोलन
Thane, Thane | Nov 7, 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिळफाटा येथील अनाधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेतर्फे आज कारवाई होत आहे. मात्र शिळफाटा येथील रहिवासी आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपासून ठाणे महापालिका कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. यावेळी महिला देखील मोठ्या प्रमाणात जमल्या आहेत. घरांवर कारवाई करू नये व आमचा विचार करावा या मागणीसाठी हे रहिवासी ठाणे महापालिका कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.