साकोली: साकोली उपजिल्हा रुग्णालयात रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधींचा तुटवडा,तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रूग्णांची तक्रार
साकोली उपजिल्हा रुग्णालयासह एकोडी, घानोड व इतरही आरोग्य केंद्रात रक्तदाब व मधुमेह नियंत्रित करणाऱ्या औषधांचा पंधरा दिवसांपासून तुटवडा आहे.औषध मिळत नसल्याने रुग्णांनी साकोली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश बडवाईक यांच्याकडे मंगळवार दि.11 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता तक्रार केली आहे