चंद्रपूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक करा - पालकमंत्री डॉ. अशोक उईके
गावाच्या सर्वांगीन विकासासाठी महत्वाच्या असलेल्या या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम करून जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.मोरवा येथे आज दि 17 सप्टेंबरला 12 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.