अमरावती: जिल्हाधिकारी कार्यालयात भारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन
वंदे मातरम्' राष्ट्रगीताच्या १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.