रेणापूर: मोटेगाव येथेशक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्याने विष प्राशन करण्याचा केला प्रयत्न
Renapur, Latur | Nov 29, 2025 मोटेगाव येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, भूमिअभिलेख विभाग, तलाठी, नायब तहसीलदार आणि पोलिस पथक मोठे गाव शिवारात पोहोचले. मात्र शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत मोजणीस नकार दिला. विरोध झुगारून प्रशासनाने मोजणीचा प्रयत्न केल्याचे पाहताच शेतकऱ्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलत विष प्राशनाचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मोजणी प्रक्रिया थांबवून माघार घेतली.