ठाणे: ठाण्यात रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे मनसेने उचलले मोठे पाऊल
Thane, Thane | Nov 9, 2025 ठाण्यामध्ये रक्ताचा तुटवडा पडला असून पुढील पाच दिवस पुरेल एवढाच रक्त साठा असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर मनसेने पुढाकार घेतला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महा रक्तदान राबवण्यात येणार असून सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहनकेले होते. केलेल्या आव्हानानुसार आज राबवलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह ठाणेकर नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आव्हान केले