धामणगाव रेल्वे: गांधी चौक येथे क्षत्रिय मराठा कलार समाजाचे भव्य महासंमेलन संपन्न; हजारो समाज बांधव उपस्थित
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक तसेच विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाचे भव्य महासंमेलन संपन्न झाले. या महासंमेलनात युवक-युवती परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी सन्मान, तसेच समाजातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला आहे.कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रबाहू अर्जुन जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या भव्य सोहळ्याचे ठिकाण माहेश्वरी भवन, धामणगाव रेल्वे पार पडला आहे. समाजातील विविध मान्यवर व विदर्भातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित झाले होते.