शेंदुर्णीत २८२ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव उत्साहात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे आज दि. ४ नोव्हेंबर रोजी २८२ वर्षांची परंपरा असलेला विठ्ठल रुख्मणी रथोत्सव उत्साहात पार पडला. सकाळी ११ वाजता संस्थानचे आठवे गादीपती हभप शांताराम भगत आणि मान्यवरांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन व महाआरती होऊन रथोत्सव मिरवणूकीस सुरुवात झाली. या रथ मिरवणुकीत रथ, पालखीसह महिला पुरुष भजनी मंडळ, सजीव देखावे आदींचा समावेश होता.