सालेकसा: बाह्मणी येथील ग्रामपंचायत अधिकारी खोब्रागडे निलंबित
निविदा न काढताच बिल काढणे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीची अफरातफर करणे आणि विविध बाबी चौकशीतून पुढे आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम यांनी सालेकसा तालुक्यातील बाह्मणी पाथरीच्या ग्रामपंचायत अधिकारी संजू खोब्रागडे यांना दि.२४ नोव्हेंबर रोजी निलंबित केले बाह्मणी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायती अधिकारी संजू खोब्रागडे यांनी 2022-23 2023-24 आणि 2024-25 मध्ये आलेल्या निधीची वार्षिक निविदा न करता अवैधरिता देवांश ट्रेडर्स या कंत्राटदराच्या नावाने बिल काढणे पंधराव्या वित्त आयोगामधील निधीची