माण: माण तालुक्यातील मार्डीत दिवाळी पाडव्याच्या रात्री चोरट्यांचा अक्षरश: धुमाकूळ; जागरूक नागरिकांमुळे चोरीचा प्रयत्न फसला
Man, Satara | Oct 23, 2025 माण तालुक्यात मार्डी येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने व्यापारी आणि ग्रामस्थांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ आली. येथील सात घरे आणि एक सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असून,ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. माण तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील महिला व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मार्डी गावात चोर आल्याचे नागरिकांनी कळविल्यानंतर पोलिसांची गाडी आली.