उमरा देशमुख येथिल शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा त्याग करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये जाहीर प्रवेश करताच मेहकर-लोणार मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव यांच्या पुढाकारातून झालेल्या या मेगा प्रवेशामुळे ‘मशाल’ अधिक प्रखर झाल्याची भावना येथील नागरिकांन मध्ये आहे.