औंढा नागनाथ: जवळाबाजार येथे चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात दबून बसला,औंढा नागनाथ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील मार्केट कमिटी जवळील एका दुकानाच्या बाजूला दिनांक 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अंधारात चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एकास गस्तीवरील औंढा नागनाथ पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस हवालदार इमरानोद्दीन सिद्दिकी यांच्या फिर्यादीवरून दिनांक 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता गोपीचंद उर्फ गोपाळ खिल्लारे यांच्यावर औंढा नागनाथ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.