तुमसर: जांब येथे जलसा निमित्त मराठी लावणी कार्यक्रमात माजी आमदार चरण वाघमारे यांची उपस्थिती
दिवाळीच्या पावन पर्वावर गत पंधरा दिवसांपासून भंडारा जिल्ह्यासह विविध तालुक्यात मंडई, जलसा कार्यक्रमाची परंपरा असून आज दि. 11 नोव्हेंबर रोज मंगळवारला सायं.7 वा. मौजा जांब येथे जलसा निमित्त मराठी लावणी कार्यक्रमात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी कार्यक्रमाला भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जि.प. सदस्य चंदू पिल्लारे, माजी पं. स. सदस्य बबलू मलेवार, तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र बाभरे प्रामुख्याने उपस्थित होते.