समुद्रपूर: मोहगांव येथे उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व बौद्ध कमिटीकडून जयंती साजरी
भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती समारोहाचे आयोजन मोहगांव ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद शाळा व बौद्ध कमेटीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आले होते.यावेळी सर्वप्रथम मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विलास नवघरे यांच्या मार्गदर्शनात उपस्थिती मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर जिल्हा परिषद शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.