पवनी: आदर्श कन्यांचा आदर्श पराक्रम! डॉजबॉलच्या मैदानावर पहिल्याच वेळी जिल्हा विजेतेपदाचा किताब
Pauni, Bhandara | Nov 12, 2025 १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आदर्श हायस्कूल पारडीच्या मुलींनी उल्लेखनीय संघभावना, चपळाई आणि आत्मविश्वासाने खेळ करत उपांत्य फेरीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात नूतन कन्या विद्यालय भंडारा विरुद्ध आदर्श हायस्कूल पारडी असा रंगतदार सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपला संतुलित खेळ कायम ठेवत पारडीच्या मुलींनी ६ गुणांच्या आघाडीने विजय मिळवून जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावला.