जामखेडमध्ये राजकीय वातावरण तापले असताना सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राम शिंदे म्हणाले की, 2019 आणि 2024 मध्ये रोहित पवार यांनी पैशाच्या जोरावर विजय मिळवला. ज्यांच्या आधारावर ते निवडून आले, ते सर्व सहकारी आज भाजपात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाला नाही त्यांची कार्यपद्धती आणि मतदानावर प्रभाव टाकण्याचे तंत्र लोकांना कळले आहे. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. त्यांना आज त्यांचा पराभव दिसत आहे.