कन्नड: कन्नडमध्ये शेतकऱ्यांची शोकांतिका; माजी आमदार जाधवांचा हृदयाला भिडणारा व्हिडिओ चर्चेत!
कन्नड तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतीतील गुंतवणूक वाया गेल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकताच लोहगाव येथील एका शेतकऱ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि ५ नोव्हेंबररोजी रात्री ९ वाजताभावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. सदरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे.