आमगाव: जिल्ह्यात निवडणुकीच्या २४ तासांपूर्वी प्रचारतोफा थंडावतील,नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक
Amgaon, Gondia | Nov 28, 2025 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये महत्त्वाचे निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान डिसेंबर २०२५, तर मतगणना ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.