अंबड–डावरगाव पाटी येथे भीषण अपघात : शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; पुत्र गंभीर जखमी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डावरगाव पाटी (जालना–बीड रोड) येथे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी पहाटे सुमारे 5.30 ते 6 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यात शेतकरी परमेश्वर गंगाभीषण धुपे (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पुत्र गौरव परमेश्वर धुपे (वय 22) गंभीर जखमी झाले आहेत. अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर धुपे आणि त्यांचा मुलगा गौरव हे ऊसतोडीचे काम सुरू असल्याने ट्रॅक्टरसह डावर