खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी उघडपणे जादूटोण्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका बंद घराच्या दारात दही-भात, लिंबू, हळद-कुंकू लावून नारळ फोडल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.