कारंजा: कामठवाडा-सोमठाणा घाट मार्ग.
अपघातांचा धोका वाढला. झाडाझुडपांच्या विळखा.
Karanja, Washim | Nov 26, 2025 आज २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी प्राप्त माहीती नुसार कारंजा - दारव्हा या मार्गावरील वरील कामठवाडा - सोमठाणा घाट या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्यालगत वाढलेली प्रचंड झाडी आता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. बोरीची झाडे, काटेरी झुडपे, तरोटा आणि कमरेएवढे वाढलेले गवत यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट व्यापून गेला आहे..