शिरूर: चिंचणी येथील घोड धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळु उपसा
Shirur, Pune | Nov 8, 2025 शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात गेल्या सहा महिन्यापासुन यांत्रिक बोटींच्या साह्याने रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. महसुल विभागाने दोन वेळा कारवाई करत 'जिलेटिन' च्या साह्याने यांत्रिक बोटी फोडल्या होत्या. परंतु तरीही मुजोर झालेल्या वाळू माफियांनी वाळू उपसा सुरुच ठेवला आहे.