रामटेक: बच्चू कडूच्या आंदोलनाला रामटेक तालुक्यातील महादुलावासियांचे समर्थन ; महादुला चौकात शेतकऱ्यांचे प्रदर्शन
Ramtek, Nagpur | Oct 28, 2025 मंगळवार दि. 28 ऑक्टोबरला परिसरातील शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या कार्यात व्यस्त असल्याने मंगळवारला नागपूर येथे आयोजित बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचू शकले नाही. परंतु त्यांच्या आंदोलनाला परिसरातील शेतकरी बांधवांचे संपूर्ण समर्थन आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे भंडारबोडी पंचायत समिती सर्कलप्रमुख विजय हारोडे यांनी करीत मंगळवार दि. 28 ऑक्टोबरला सायं.सात ते साडेसात वाजता पर्यंत महादुला चौकात शेतकरी आंदोलन केले.