उल्हासनगर: बातमी प्रसारित केली म्हणून पत्रकार आणि त्याच्या भावावर तडीपार गुंडांनी केला जीवघेणा हल्ला
उल्हासनगर परिसरामध्ये एका पत्रकारावर व त्याच्या भावावर जीवघेना हल्ला केल्याची घटना घडली आहे. तडीपार गुंडांच्या विरोधात एक बातमी प्रसारित केली होती.त्याचा राग मनात ठेवून तडीपार दोन गुंडांनी एका पत्रकारावर आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. यामध्ये पत्रकार आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले मात्र दोन सराईत तडीपार असलेले गुन्हेगार फरार झाले असून त्यांचा शोध उल्हासनगर पोलीस घेतआहेत