आष्टी: दोन अस्वलीशी एक तास बाप लेकाची झुंज.. थार मार्गावर आडनाला परिसरात घटना जखमींना केले उपचारर्थ अमरावती येथे दाखल ..
Ashti, Wardha | Nov 26, 2025 थार मार्गावर आडनाला परिसरात दुचाकी ने जाणाऱ्या दोघांवर असवलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ ला दुपारी अडीच ला घडली. दोन अस्वल असल्याचे या जखमींनी सांगितले या दोघांनी एक तास झुंज दिल्यावर अस्वली पळून गेल्या जखमींनी जोरजोराने मोठमोठ्याने आवाज केल्याने मागावहून येणारे चारचाकी वाहन थांबले आणि जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर अमरावती येथे उपचारसाठी पाठविण्यात आले आहे. सदाशिव शेळके आणि सागर शेळके राहणार आष्टी असे जखमीचे नाव आहे..