अंबरनाथ: बदलापूर येथे मुलाच्या डोक्यात पडला बांबू
बदलापूर येथील दत्तवाडी परिसरातून ठेकेदाराचा आणि बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास समोर आला आहे. बदलापूर दत्तवाडी परिसरामध्ये बांधकाम सुरू असताना एका 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात बांबू पडल्याची घटना घडली. यामुळे हा मुलगा गंभीरित्या जखमी झाला असून या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.