राहुरी: राहुरीत तनपुरेंच्या प्रचार फलकावर काळे फासण्याची घटना,निवडणूक तापल्या; कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा उद्रेक
राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. तनपुरे गटाच्या प्रचार फलकावर अज्ञात घटकांनी काळे फासून तसेच काही बॅनर फाडून असंतोष निर्माण केल्याची गंभीर घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी हि घटना उघडकीस आली आहे.