सातारा: महायुतीची रणनिती अखेर ठरली; स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी समन्वय समितीच्या विशेष बैठकीत सखोल चर्चा
Satara, Satara | Nov 11, 2025 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महायुतीने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी एकत्रित लढण्याच्या धोरणावर महत्त्वपूर्ण चर्चा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाली. ही बैठक पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थानी पार पडली.बैठकीत महायुती म्हणून राज्यस्तरावर एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव पुढे आला.