वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४३३/२०२५ अंतर्गत भा.दं.सं. कलम ३१९(२), ३१८(४) व आयटी अॅक्ट कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. कर्वेनगर येथील ४५ वर्षीय महिलेला ऑनलाईन माध्यमातून पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईल व टेलिग्राम वापरकर्त्यांनी तिचा विश्वास संपादन करून नमूद बँक खात्यांमध्ये रुपये ८ लाख ११ हजार जमा करवून घेतले. पोलीसांनी तपास सुरू केला आहे.