कोरेगाव: सलग दोन मंत्र्यांना ‘कोंडीचा’ धक्का; कोरेगावची वाहतूक व्यवस्था ठप्प, प्रशासन झोपेत का?
साखर कारखान्यांच्या ट्रॉलींनी भरलेल्या रस्त्यांमुळे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस विक्राळ रूप घेत आहे. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ताफा या कोंडीत अडकला होता. त्यानंतर शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. एकूणच वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला असून प्रशासन झोपेतून उठणार तरी कधी, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास गोरे यांचा ताफा बोराटवाडीतून साताऱ्याकडे निघाला होता.