साकोली: नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीच्यावतीने एमबी पटेल येथे पक्षी सप्ताहाची सांगता,उपसंचालक कोडापेंची उपस्थिती
नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवलेल्या पक्षी सप्ताह कार्यक्रमाची सांगता साकोलीतील एम.बी पटेल कॉलेज येथे बुधवार दि.12 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आली या निमित्याने डॉ. सलीम अली यांची जयंती साजरी करून निसर्गचित्र स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते प्राचार्य डॉ. खुणे व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे,मनिषा चव्हाण यांची उपस्थिती होती