वर्धा: आर्वी येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस; वर्धा गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
Wardha, Wardha | Nov 25, 2025 स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पोलीस स्टेशन आर्वी हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणत सुमारे ₹२९,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी चिंटू उर्फ चरणसिंग मुकिंदसिंग बावरी (वय २२, रा. सिखबेडा, तळेगाव (शा.प.), ता. आष्टी, जि. वर्धा) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती ता. २५ मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झाली.