रामटेक: न प रामटेक निवडणूक ; 28 केंद्रांवर 20, 508 मतदार करणार मतदान
Ramtek, Nagpur | Dec 1, 2025 रामटेक नगरपरिषदच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवार दिनांक 2 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजता पर्यंत मतदान होणार आहे. रामटेक शहरातील एकूण 28 मतदान केंद्रांवर मतदार मतदान करतील. यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून केंद्राचे कर्मचारी व पोलीस आपल्या केंद्रांवर पोहोचले आहेत. एकूण 20508 मतदारात 10629 महिला व 9879 पुरुष मतदार आहेत मतदार पाच उमेदवारातून एक नगराध्यक्ष तर 11 उमेदवारातून 19 नगरसेवक निवडणार आहेत.