पवनी: पवनी येथील उजव्या कालव्यात आढळला मृतदेह ! पवनी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
मंगळवारी वार्ड येथील पुलीयाजवळील उजव्या कालव्यात एक मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ याची खबर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत मृत व्यक्तीचे नाव तुलाराम श्रावण धांदे (वय ६० वर्ष, रा. बेलघाटा वार्ड, पवनी, ता. पवनी) असे समोर आले. मृतकाचा भाऊ सुधाकर श्रावण धांदे (वय ५७ वर्ष) यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली.