वर्धा: वर्धा जिल्ह्यातील मनसावळी येथील कालवा फुटला; शेतांना तळ्याचे स्वरूप
Wardha, Wardha | Nov 28, 2025 वर्धा जिल्ह्यातील मनसाळी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या नांदगाव (कानगाव) वितरिकेचे मनसावळी येथील कालवा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. काही शेतातील हरभऱ्याचे अंकुरलेले पीक खरडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने पिकांवर विपरित परिणाम झाला असून अडचणीत मोठी भरच पडली आहे.