चोपडा: चोपडा बस स्थानकावर वाडा यावल बस मधून वाहकाने विद्यार्थ्यांना खाली उतरून केली शिवीगाळ, यावल आगारात पालकांची तक्रार
Chopda, Jalgaon | Sep 17, 2025 चोपडा येथील बस स्थानकावर वाडा यावल बस क्रमांक एम. एच.१४ एम.एच.३७०७ लागली होती. या बस मध्ये किनगाव येथील पास असलेली विद्यार्थी बसले मात्र वाहकाने या विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरवले व शिवीगाळ केली. तेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावल आगारात याबाबत लेखी तक्रार दिली आहे. यावल आगार प्रमुखांनी सांगितले की, सदर बस वाडा आगाराची असून ही तक्रार आपण तिकडे पाठवून यापुढे असा प्रकार घडणार नाही याबद्दल काळजी घेण्याचे कळवणार आहोत.