सिंदखेड राजा: राहेरी बुद्रूक शिवारात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी येथील शेतकरी रामकिसन विश्वनाथ शितोळे यांनी राहेरी बुद्रूक शिवारात १२ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून किनगाव राजा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.