पुणे शहर: कोथरूडमधील महिलेकडून युवकाला विवाहाची जबरदस्ती; ब्लॅकमेलप्रकरणी गुन्हा.
कोथरूडमधील महिलेकडून युवकाला विवाहाची जबरदस्ती; ब्लॅकमेलप्रकरणी गुन्हा. – कोथरूड परिसरातील गौरी प्रल्हाद वांजळे (३८) हिच्यावर आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. ३७ वर्षीय युवकासोबत जवळीक वाढवून त्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर दोन लाख रुपये दे; अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन,” अशी धमकी वांजळे हिने दिल्याचे नमूद आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी भादंवि कलम ३०८(७) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून