राहाता: दत्त जयंती निमित्तान शिर्डी दुमदुमली...!साई दिगंबरा जय घोषाण दत्तदर्शन.
राज्यभर दत्तजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून शिर्डीतही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. गुरुवार आणि दत्तजयंती एकत्र आल्यानं शिर्डीमध्ये सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी उसळली आहे. विविध ठिकाणांहून आलेल्या पायी पालख्या शिर्डीत दाखल होताच ‘साईनाम’ आणि ‘दत्त दिगंबर’च्या जयघोषानं संपूर्ण शिर्डी मंगलमय वातावरणानं दुमदुमली. साईबाबांना दत्तात्रेयाचे स्वरूप मानणारे भाविक मोठ्या भक्तिभावाने साई मंदिरात दर्शन घेत आहेत. तर लेंडीबागेतील दत्त मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने उजळून निघाले आहे. दु