उदगीर: नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण,कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप
Udgir, Latur | Dec 1, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे, यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे,१ डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या उपस्थितीत कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मतदान केंद्र निहाय कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले,कर्मचाऱ्यांनी मतदानाचे साहित्य घेवून आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले