कुरखेडा: कूरखेडा येथे १०७ निरंकारी अनूयायांचे रक्तदान,
संत निरंकारी मंडळाचा पूढाकार
संत निरंकारी चैरिटेबल ट्रस्ट शाखा कूरखेडा यांचा वतीने आज दि.१७ सप्टेबंर बूधवार रोजी सकाळी ९ ते दूपारी ४ वाजेदरम्यान संत निरंकारी सत्संग भवन कूरखेडा येथे आयोजित रक्तदान शिबीरात एकूण १०७ निरंकारी अनूयायी व नागरिकानी रक्तदान करीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली यावेळी २ महिला भगिनीनी सूद्धा रक्तदान केले हे विषेश.रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी आमदार कृष्णाजी गजबे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशनभाऊ नागदेवे होते.