शहरातील हॉटेल निलकमल येथे आंबेडकरी समाजाची बैठक
Beed, Beed | Nov 24, 2025 बीड शहरातील हॉटेल निलकमल येथे सोमवार दि 24 नोव्हेंबर रोजी, सुपारी 12 वाजता आंबेडकरी समाजाकडून सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणाला मत देण्याचा निर्णय झाला. या बैठकीत, मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर बाहेरील उमेदवार लादल्याचा निषेध करण्यात आला. समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि आरक्षणाच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकजूट महत्वाची आहे, असे आवाहन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मोठ्या संख्येने समाज बांधव या बैठकीस उपस्थित होते.