पुणे शहर: विस्तारित हद्दीतून जीएसटीचा हिस्सा अद्याप महापालिकेला नाही.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधून वसूल होणाऱ्या जीएसटीच्या हिस्स्याचा निधी अद्याप महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे जवळपास २ हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारला पुन्हा पत्र पाठवणार आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. जकात आणि एलबीटी बंद झाल्यानं