खामगाव: खामगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये तसेच शहरातील आधारकेंद्रांवर आधार अपडेटसाठी लाडक्या बहिणींची तोबा गर्दी
राज्यात सरकारने जाहिर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा लाडक्या बहिणींना लाभ सुरळीत सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र आधार केंद्रांवर तोबा गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.लाडक्या बहिणींना ई-केवायसीकरीता आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.